'क्‍लाउड'चा वापर पोचेल 45 टक्‍क्‍यांवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

नाशिक - बदलत्या तंत्रज्ञानाचे प्रतिबिंब आयटी क्षेत्रातही उमटत असून, कंपन्यांकडून क्‍लाउड कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे. आयटी उद्योगातील सर्वेक्षणानुसार 2019 अखेरपर्यंत 45 टक्‍के आयटी उद्योगाकडून क्‍लाउड कॉम्पयुटिंगचा वापर केला जाईल. 2020 पर्यंत एकंदरीत 43 टक्‍के उद्योग क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे चित्र आहे.

नाशिकच्या ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रा. लि. कंपनीने परिस्थितीचा अंदाज घेत वाढत चाललेल्या ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी "इंटेल'च्या तंत्रज्ञानावर तयारी केलेली आहे. नाशिक व मुंबई (महापे) येथे डाटा सेंटर कार्यरत असून, लवकरच बंगळूर येथील डेटा सेंटरदेखील सुरू केले जाणार आहे. ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी "ईएसडीएस'तर्फे पेटंट प्राप्त एनलाइट क्‍लाउंड तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याने ग्राहकांनाही त्याचा फायदा होऊ शकेल, असे "ईएसडीएस'चे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी यांनी सांगितले.

आयटी क्षेत्रातील क्‍लाउड तंत्रज्ञान
22 टक्के 2015 पर्यंतचा वापर
35 टक्के 2017 पर्यंतचा वापर
45 टक्के 2019 पर्यंतचा अपेक्षित वापर
43 टक्‍के 2022 पर्यंत इतर उद्योगांकडून वापर

क्‍लाउड कॉम्प्युटिंगचे फायदे
- डाटा थेट डाटा सेंटरवर साठविला जातो
- हार्डवेअरवर होणारा खर्च टळणार
- वीजबिलात बचत करणे शक्‍य

असे आहे एनलाइट तंत्रज्ञान
पेटंट मिळविलेल्या एनलाइट हे व्हर्टिकल ऑटो स्केलिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. या तंत्रज्ञानात सीपीयू व रॅम यांच्यात योग्य समन्वय साधताना अधिक गतिशीलपणे संगणक हाताळणीची सुविधा उपलब्ध होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हे तंत्रज्ञान असंख्य ग्राहकांना एकाच व्यासपीठावर वेगवान सेवा देण्यास मदत करते.

Web Title: nashik news cloud computing technology