जिल्हाधिकाऱ्यांविरोधात विभागीय आयुक्तांकडे गाऱ्हाणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

नाशिक - तिडके कॉलनीतील लंबोदर अव्हॅन्यूमध्ये दारू दुकान सुरू करू नये, अशी मागणी केल्यावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सुनावणीचे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र सर्व कारवाई दारू दुकानाच्या बाजूने केली जात असल्याचे गाऱ्हाणे दारू दुकानाविरोधात उतरलेल्या रणरागिणींनी आज विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्याकडे मांडले. विभागीय आयुक्तांनी आम्हाला न्याय देण्याची भूमिका घेतल्याचे रणरागिणींनी सांगितले.

दारूच्या दुकानाला विरोध होतोय म्हटल्यावर दुकानासाठी गाळा भाड्याने देणाऱ्यांनी बघ्याची भूमिका घ्यायला नको होती, अशी अपेक्षा एकीकडे ‘लंबोदर’मधील महिला व्यक्त करीत होत्या. त्याचवेळी अपार्टमेंटच्या नोंदविलेल्या दस्तऐवजातील कलम १८ चे उल्लंघन झाल्याची तक्रार मुंबई नाका पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्याचवेळी सोमवारी (ता. १०) अरेरावीची भाषा वापरणाऱ्या दुकानदाराच्या साथीदाराविरुद्ध तक्रार देण्यात आली. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमातील गावठाण हद्दीच्या बाहेरील सेमी-कमर्शिअल इमारतीत प्रतिबंध असलेल्या व्यवसायांची माहिती महिलांनी संकलित केली आहे. दारू दुकानासाठी विरोधात उतरलेल्या महिलांनी कायदेशीर लढ्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचे महिलांनी स्पष्ट केले.

नेमकी काय आहे तक्रार?
जिल्हाधिकाऱ्यांनी दारू दुकानाला परवाना देताना परिसरातील रहिवाशांच्या संमतीचा विचार केला नाही. दारू दुकानामुळे शांतता धोक्‍यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न तयार होईल. अपघाताच्या प्रमाणात वाढ होणार आहे. सामाजिक व मानसिक आरोग्य धोक्‍यात येईल. परिसरातील मंदिराचा विचार करता, धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या साऱ्या बाबींकडे प्रशासन कानाडोळा करीत आहे, अशी तक्रार स्थानिक महिलांची दारू दुकानाविरोधामागील आहे. याच बाबी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फाईल
‘लंबोदर’मधील रहिवाशांनी दारू दुकानासंबंधीची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारातंर्गत मागितली होती. त्यास कार्यालयातर्फे उत्तर देण्यात आले. दारू दुकान स्थलांतराची फाइल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आली. ही फाइल मिळताच माहितीच्या शुल्काविषयी कळविण्यात येईल, असे उत्तरात नमूद करण्यात आले.

Web Title: nashik news collector