काँग्रेस-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

नाशिक - महापालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभागरचनेमुळे नगरसेवकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू होईल, हा राजकीय पक्षांचा आक्षेप आता खरा ठरला आहे. श्रेयवादाच्या लढाईची ठिणगी भाजप व काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या प्रभाग १२ मध्ये पडली असून, तिडके कॉलनीतील जलकुंभ त्यास कारणीभूत ठरला आहे. 

काँग्रेसचे नगरसेवक समीर कांबळे यांनी त्यांच्या प्रयत्नातून जलकुंभ उभारल्याचे छायाचित्र सोशल मीडियावरून व्हायरल केल्यानंतर स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी त्यास हरकत घेत यंदाच्या अंदाजपत्रकात पाच कोटी दहा लाख रुपयांची तरतूद केल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट केले.

प्रभाग १२ मधील तिडके कॉलनी, कालिका मंदिर परिसर, सहवासनगर, मातोश्रीनगर, प्रथमेशनगर, तुपसाखरे लॉन्स, मायको सर्कल व वेदमंदिर परिसर भागात अनेक वर्षांपासून पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नव्हती. २० एप्रिल २०१६ ला माजी आमदार वसंत गिते यांच्यासह तत्कालीन नगरसेविका सुनीता मोटकरी यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन जलकुंभाची मागणी केली होती. स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनीसुद्धा डॉ. गेडाम यांच्याकडे जलकुंभाची मागणी केली होती. स्थायी समिती सभापती झाल्यानंतर सभापती गांगुर्डे यांनी स्त्री मंडळाच्या सभागृहापुढील महापालिकेच्या जागेवर जलकुंभ उभारण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये पाच कोटी दहा लाख रुपयांची तरतूद केली.

अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक समीर कांबळे यांनी स्वप्रयत्नातून जलकुंभ झाल्याचा गाजावाजा करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्‍वभूमीवर सभापती गांगुर्डे यांच्यासह नगरसेविका प्रियंका घाटे, माजी नगरसेविका सुनीता मोटकरी यांनी निवेदनाचे पुरावे देत कांबळे यांचा दावा खोडून काढला.

सभापतिपदाच्या काळात या भागातील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. नवनिर्वाचित नगरसेवक समीर कांबळे यांनी श्रेय घ्यायला हरकत नाही; परंतु सर्व नगरसेवकांना समान श्रेय दिले असते तर बरे झाले असते.
- शिवाजी गांगुर्डे, सभापती, स्थायी समिती

Web Title: nashik news congress bjp political war