‘एसपीव्ही’वर स्थानासाठी दोन्ही काँग्रेसकडून दबावतंत्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नाशिक - नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीवर विरोधी पक्षातून नगरसेवकांना घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण अद्याप प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेव्यतिरिक्त काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना एसपीव्ही कंपनीवर स्थान दिले जात नाही व महापौरांकडूनही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने दोन्ही काँग्रेसकडून संचालक निवडीसाठी दबावतंत्राचा वापर सुरू झाला आहे. 

स्मार्टसिटी प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वांत प्रथम नाशिकमधून विरोध झाला. त्या वेळी स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून महापालिकेची स्वायत्तता धोक्‍यात येईल, असा दावा करण्यात आला होता. महासभेत कडाडून विरोध होण्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्या वेळी सत्ताधारी पक्षातील महापौरांसह प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांमधून दोन सदस्य घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. सध्या स्मार्टसिटी कंपनीच्या कामकाजाला वेग येत आहे. एसपीव्ही कंपनीच्या मागील बैठकीत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांची निवड जाहीर करण्यात आले. 

विरोधी पक्षनेत्यांनाही एसपीव्ही कंपनीमध्ये स्थान देण्यात आले. पण नगरसेवकांमधून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना स्थान मिळेल, अशी अपेक्षा आहे. अडीच महिने उलटले तरी त्याबाबत निर्णय होत नाही. काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी या संदर्भात नगरविकास विभागाला पत्र सादर केले आहे. महापौरांतर्फे महासभेवर स्मार्टसिटीतील अन्य दोन सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव सादर होऊन त्यातून दोन सदस्यांना एसपीव्ही कंपनीवर संचालक म्हणून पाठविले जाण्याची प्रक्रिया होणार आहे.

Web Title: nashik news congress ncp