बोंडअळीग्रस्तांना वीस कोटींचा दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

नाशिक - बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गुरुवारी (ता. 22) शासनाने घोषणा केल्याने नुकसानग्रस्तांपैकी 33 टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झालेल्यांना मदतीचा  लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात येवला व मालेगाव तालुक्‍यांतील 27 हजार 613 हेक्‍टरवरील बोंडअळीचा दणका बसला. 

यंदाच्या हंगामात नाशिक जिल्ह्यात 46 हजार 751 शेतकऱ्यांनी 33 हजार 880 हेक्‍टर कापसाची पेरणी केली. धुळ्यात मोठा दणका दिलेल्या बोंडअळीचा मालेगाव आणि 

येवला तालुक्‍यांत मोठा दणका बसला. त्यापैकी 33 टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झालेल्या 36 हजार 781 शेतकऱ्यांच्या 27 हजार 613 हेक्‍टरवर नुकसानीपोटी 20 कोटी 70 लाख  तीन हजार 96 रुपयांची मदत मिळणार आहे. बोंडअळीने जिल्ह्यात मालेगाव तालुक्‍याला मोठा दणका बसला. मालेगाव तालुक्‍यात 18 हजार 835 हेक्‍टरवर कापसाची लागवड  झाली होती. त्यापैकी 13 हजार 965 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ येवला तालुक्‍यात नुकसान झाले. येवल्यात कापसाची लागवड झालेल्या 15 हजार 45 हेक्‍टर  क्षेत्रापैकी 13 हजार 748 हेक्‍टर पिकाचे नुकसान झाले. 

Web Title: nashik news cotton farmer