राजकीय खुन्नशीतून विवाहितेवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

नाशिक - गावकीतील राजकीय खुन्नस व विवाहितेला बदनामीची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघा भावांना उपनगर पोलिसांनी अटक केली. संशयित दोघे त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील मुळेगाव येथील आहेत. पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार संशयित किरण रमेश जाधव (वय 23), रतन रमेश जाधव (वय 26) अशी दोघा भावांची नावे आहेत. किरण जाधव याचे पीडित विवाहितेच्या पतीशी गावातील राजकारणावरून भांडण झाले होते. त्या खुन्नशीतून किरणने तिचा वारंवार पाठलाग केला होता. पीडितेच्या पतीशी झालेल्या भांडणाचा समझोता करण्याच्या बहाण्याने किरणने पोलिसांत जबाब देण्यासाठी तिला दुसरीकडे नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. किरणचा भाऊ रतन जाधव यानेही पीडितेला फसविले.
Web Title: nashik news crime