तोतया पोलिसांनी वृद्धांना घातला गंडा 

तोतया पोलिसांनी वृद्धांना घातला गंडा 

नाशिक - दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पोलिस असल्याचे भासवून वृद्धांकडील सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी या दोन घटनांमध्ये दीड लाखाचा ऐवज लांबविला. 

वडाळा रोडवरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे बिल भरण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे 60 हजार रुपयांचे, तर मुंबईहून नाशिकला विवाहसोहळ्यासाठी आलेल्या वृद्ध दांपत्याचे 80 हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी हातचलाखीने लंपास केले आहेत. दोन्ही घटनांमध्ये पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, अद्यापतरी हाती काहीही लागलेले नाही. मागील दोन दिवसांत पार्किंगमधील मोटारींच्या काचा फोडून सोन्याचा ऐवज चोरीच्याही घटना घडल्या असून, त्याच्या तपासाबाबतही पोलिसांच्या पदरी अपयशच आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com