महिलेस जाळून मारणाऱ्या पतीला जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

नाशिक - पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या दांपत्यात घरगुती भांडणाच्या कारणातून अंगावर डिझेल टाकून जाळणाऱ्या आरोपी पतीला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी जन्मठेपची शिक्षा सुनावली. राष्ट्रपाल आनंदा धाबो (वय 27, रा. कवठेकरवाडी, पांडव लेणी, पाथर्डी फाटा, नाशिक) असे आरोपीचे नाव असून, ही घटना 7 जानेवारी 2016 ला रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली होती.

कवठेकरवाडीत राहणारा आरोपी राष्ट्रपाल आणि पत्नी रमा यांच्यात भांडण झाले होते. रागाच्या भरात रमा हिने घरातील डिझेल अंगावर ओतून घेत जाळून घेण्याची धमकी दिली. रमा हिने अंगावर डिझेल ओतून घेतल्याची माहिती असूनही त्याने काडी पेटवून पत्नी रमाच्या अंगावर टाकली. यात रमा 90 टक्के भाजल्याने तिचा मृत्यू झाला. 

Web Title: nashik news crime Husbands life imprisonment