ऑक्‍टोबरमध्ये डेंगीचे  पावणेचारशे संशयित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नाशिक - ऑक्‍टोबरमध्ये तब्बल ३७२ डेंगीचे संशयित रुग्ण आढळून आले. वैद्यकीय चाचण्यांतून १४३ रुग्णांना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले.

जानेवारी ते जुलैदरम्यान डेंगीचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अत्यल्प होते. परंतु, ऑगस्टमध्ये यात झपाट्याने वाढ झाली. ऑगस्टपासून रुग्णवाढीचा आलेख उंचावलेला राहिला, तो अद्यापही कायम आहे. ऑक्‍टोबरमध्ये या वर्षी सर्वाधिक डेंगीचे रुग्ण आढळले. ३७२ पैकी १४३ रुग्णांना डेंगी असल्याचे निष्पन्न झाले. जानेवारी ते ऑक्‍टोबरपर्यंत एक हजार ४४ संशयित रुग्ण आढळले, त्यातील ३९९ रुग्णांना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले.

सिडकोत सर्वाधिक रुग्ण
सिडको विभागात पाणी साठविण्याकडे महिलांचा कल असतो. त्यामुळे या भागात डेंगीच्या अळ्या अधिक प्रमाणात आढळत असल्याचा दावा आरोग्य विभागाने  केला आहे.

सिडकोत जानेवारी ते ऑक्‍टोबरपर्यंत १२९ रुग्ण आढळून आले. पूर्व विभागात ६०, पश्‍चिम विभागात २१, नाशिक रोड विभागात ६३, पंचवटी विभागात ५७, तर सातपूर विभागात ६९ डेंगीचे रुग्ण आढळले. सुदैवाने या वर्षी डेंगीने एकही व्यक्ती मृत झाली नाही. जुने नाशिक भागातील एका मुलीचा मृत्यू डेंगीने झाला नसल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले होते.

असे वाढले रुग्ण
 जानेवारी    ४
 फेब्रुवारी    ५
 मार्च    ४
 एप्रिल    २
 मे    ६
 जून    १९
 जुलै    १४
 ऑगस्ट    ९७
 सप्टेंबर    १०५
 ऑक्‍टोबर    १४३

Web Title: nashik news dengue