डेंगी, स्वाइन फ्लूच्या रुग्णांत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

जुने नाशिक - अस्वच्छतेच्या गर्तेत सापडलेल्या जुने नाशिककडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. साथींच्या आजारांसह डेंगी, स्वाइन फ्लूसारख्या गंभीर आजारांची लागण येथील नागरिकांना होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दिसत आहे.

बागवानपुरा येथील नऊवर्षीय आयेशा शेख हिचा डेंगीमुळे मंगळवारी (ता. १२) मृत्यू झाला होता. दुसरीकडे कावीळ, मलेरिया, साधा ताप आदी रुग्णांची रुग्णालयात गर्दी होत आहे. रुग्णालयात स्वाइन फ्लूवर उपचार घेणाऱ्या आठ संशयित रुग्णांमध्येही जुने नाशिक येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. तरी येथील अस्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. शिवाय धूर, औषधफवारणी केली जात नसल्याने डासांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रभाग सभेसह विविध बैठकांमध्ये येथील आरोग्याच्या समस्यांची अधिकाऱ्यांना जाणीव करून दिली जात आहे. तरी सदस्यांच्या तक्रारींकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे येथील परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याची टीका नगरसेवकांनी केली आहे. दुसरीकडे कथडा येथील नाईक शाळेसह प्रभागाच्या विविध भागांत कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. शिवाय डेगींने मृत झालेली आयेशा ज्या ठिकाणी राहत होती, त्याच परिसरात मोकळे मैदान आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे आहेत. पावसाचे पाणीही मोठ्या प्रमाणावर साचले आहे. त्यामुळे डेंगीच्या डासांची संख्या वाढली आहे. 

या मैदानाच्या स्वच्छतेसह प्रभागाच्या विविध भागांतील स्वच्छता, औषध, धूरफवारणीची मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: nashik news dengue, swine flu patient increase