डॉ. हुसेन रुग्णालयातील ११ डॉक्‍टरांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

जुने नाशिक - डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील ११ डॉक्‍टरांच्या बदल्या अन्य रुग्णालयात झाल्या असून, बदली झालेल्या डॉक्‍टरांच्या जागी अन्य रुग्णालयातून आठ नवीन  डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली. 

महापालिका रुग्णालयातील एकाच रुग्णालयात कार्यकाळ पूर्ण झालेले, तसेच प्रशासकीय कामकाजाच्या सोयीने रुग्णालयातील कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सुमारे ४४ डॉक्‍टरांच्या बदल्या करण्यात आल्या. 

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील ११ डॉक्‍टरांचा यात समावेश आहे. त्यांच्या जागी अन्य रुग्णालयातील आठ डॉक्‍टर बदलून आले आहेत. रुग्णालयात तीन डॉक्‍टरांची कमी भासणार आहे. 

नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयानंतर महापालिकेच्या रुग्णालयामध्ये रुग्णांची सर्वाधिक गर्दी होणारे रुग्णालय म्हणून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाची ओळख आहे. 

जुने नाशिक, वडाळागाव, भारतनगर, शिवाजीवाडी, इंदिरानगर, विनयनगर या भागातील रुग्णांना डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय सोयीचे वाटत असल्याने या ठिकाणी रुग्णांची अतिरिक्त गर्दी होते. रुग्णांचा विचार करता येथे तुलनेने डॉक्‍टरांची संख्याही कमी भासते. 

बदली झालेले डॉक्‍टर  
डॉ. प्रज्ञा पाटील, डॉ. किरण पाटील, डॉ. अर्चना बोधले, डॉ. अमोल चौधरी, डॉ. स्नेहल भट, डॉ. मनोज कांकरिया, डॉ. शलाका ढगे, डॉ. स्नेहल बागडे, डॉ. बी. एस. जाधव, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. योगेश कोशिरे.
 
बदलून आलेले डॉक्‍टर
डॉ. रिना काळदाते, डॉ. प्रशांत शेटे, डॉ. इव्हेलिन मेलिटा, डॉ. दीपाली पाटील, डॉ. संगीता काकडे, डॉ. सोफिया अन्सारी, डॉ. ललित बागूल, डॉ. रिना पाटील.

Web Title: nashik news doctor Dr. Hussein hospital