महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न
महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

सटाणा (नाशिक) : येथील मालेगाव रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर बुधवारी (ता. २९) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडून २३ लाख ११ हजार रुपयांची रोकड लुटले. तर बसस्थानकापासून काही अंतरावरच असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन देखील चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आले. या धाडसी चोरीमुळे सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. एटीएम फोडून लाखो रुपयांची लुट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे तगडे आव्हान सटाणा पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. शहर व तालुक्यात एटीएम फोडून लाखो रुपये लुटल्याची ही पहिलीच घटना असून सुरक्षारक्षकांविना असुरक्षित असलेल्या एटीएम मशीन्सला आता चोरट्यांनी लक्ष केल्याने बँकांची सुरक्षादेखील आता धोक्यात आली आहे.

याबाबतचे वृत्त असे : सटाणा शहरात स्टेट बँकेचे चार एटीएम मशीन्स असून त्यापैकी मालेगाव रोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारासमोर एक एटीएम मशीन आहे. या एटीएम मशीन्स मध्ये रक्कम भरण्याचे काम 'ब्रिंक इंडिया प्रा.लिमिटेड' ही कंपनी करते. आज सकाळी हे एटीएम बंद असल्याची ऑनलाईन माहिती 'ब्रिंक इंडिया प्रा.लिमिटेड' च्या मुंबई कार्यालयाला प्राप्त झाल्याने त्यांनी एजन्सीचे ऑपरेटर योगेश वैद्य आणि एटीएम ऑपरेटर सतीश रौंदळ यांना तात्काळ एटीएम केंद्रावर भेट देण्याचा आदेश दिला.

आज सकाळी ७ वाजून ०३ मिनिटांनी या कर्मचाऱ्यांनी एटीम केंद्राला भेट दिली असता एटीएम मशीन समोरील 'व्हॉल्ट दरवाजा' गॅस कटरने कापलेला दिसला. एटीएम मशीन फोडल्याचे निदर्शनास येताच दोन्ही कर्मचाऱ्यांनी येथील स्टेट बँकेचे कॅश ऑफिसर लक्ष्मण करवाडे यांना घटनेची माहिती दिली. करवाडे यांनीही तात्काळ सटाणा पोलिसांना चोरीची माहिती देऊन एटीएम केंद्र गाठले. एटीएम मशीनची क्लोझिंग शिल्लकची ऑनलाइन माहिती घेतली असता ५०० रुपयांच्या ४२७२ नोटा तर १०० रुपयांच्या १७५० अशी एकूण २३ लाख ११ हजारांची रोकड एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद स्टेट बँकेचे कॅश ऑफिसर करावडे यांनी सटाणा पोलिस ठाण्यात दिली आहे.

सटाणा स्टेट बँकेचे एटीएम फोडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रावर वळविला. चोरट्यांनी हे एटीएम मशीन देखील गॅस कटरने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यानंतर चोरट्यांनी पोबारा केला.

दरम्यान, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. नाशिकहून श्वानपथक, ठसेतज्ञ व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येऊन तपास सुरू केला. श्वानाने काही अंतरापर्यंत माग दाखविला. सटाणा पोलीस या घटनेची कसून तपास करीत आहेत.

एटीएम केंद्र सुरक्षारक्षकाविना...
सटाणा शहर व तालुक्यात स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आय.डी. बी. आय., एच डी.एफ.सी., देना बँक, आय.सी.आय.सी.आय. आदी विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी ग्राहकांसाठी एटीएम मशिन्सची सोय उपलब्ध केलली आहे. मात्र त्यापैकी बहुतांश एटीएम केंद्र सुरक्षारक्षकाविना बेभरवशावर आहेत. त्यामुळे चोरट्यांना आयतीच चोरीची संधी उपलब्ध झाली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com