शिंदे येथील वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नाशिक - शिंदे (ता. नाशिक) येथील वृद्ध शेतकरी नामदेव देवराम झाडे (65) यांनी कर्जाला कंटाळून राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

नाशिक - शिंदे (ता. नाशिक) येथील वृद्ध शेतकरी नामदेव देवराम झाडे (65) यांनी कर्जाला कंटाळून राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

नामदेव झाडे यांनी रविवारी (ता. 28) दुपारी दोनच्या सुमारास विषारी औषध प्राशन केल्यानंतर नातेवाइकांनी त्यांना नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना काल (ता. 29) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर सोसायटीचे 35 हजार, वीजपंपाचे बिल 35 हजार असे एकूण 70 हजारांचे कर्ज होते. गेल्या वर्षभरात त्यांनी पिकविलेल्या शेतमालाला भाव न मिळाल्याने ते निराश होते. त्यांच्याकडे दीड एकर शेती असून, घरची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यांचा एक मुलगा रिक्षाचालक आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: nashik news farmer suicide