ढकांबेजवळ रात्री गुंडाच्या कारवर गोळीबार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नाशिक - आरोग्य विज्ञान विद्यापीठ ते दिंडोरी टोल नाका यादरम्यान ढकांबेजवळ साई गार्डन येथे धावत्या चारचाकीतून आलेल्या संशयितांनी रिटझ चारचाकीवर (एमएच 18, डब्ल्यू 4988) पिस्तुलीतून दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली. या कारमध्ये सराईत गुन्हेगार सुनील चांगले होता, असे समजते. ही घटना बुधवारी (ता. 17) रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास घडली. कारचालकाच्या शेजारच्या काचेवर गोळी लागल्याने काच फुटली. पंचवटीतील अंतर्गत टोळीतून संबंधित प्रकार घडला असावा, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी धाव घेत घटनास्थळाहून एक काडतूस जप्त केले आहे.

नाशिक - आरोग्य विज्ञान विद्यापीठ ते दिंडोरी टोल नाका यादरम्यान ढकांबेजवळ साई गार्डन येथे धावत्या चारचाकीतून आलेल्या संशयितांनी रिटझ चारचाकीवर (एमएच 18, डब्ल्यू 4988) पिस्तुलीतून दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली. या कारमध्ये सराईत गुन्हेगार सुनील चांगले होता, असे समजते. ही घटना बुधवारी (ता. 17) रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास घडली. कारचालकाच्या शेजारच्या काचेवर गोळी लागल्याने काच फुटली. पंचवटीतील अंतर्गत टोळीतून संबंधित प्रकार घडला असावा, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी धाव घेत घटनास्थळाहून एक काडतूस जप्त केले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, दिंडोरी पोलिस घटनास्थळी थांबून होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल नव्हता. 

Web Title: nashik news firing