भिवंडी जवळ अपघातात जुने नाशिकमधील 4 मृत्युमुखी; 2 जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

इनोव्हा कारचे टायर फुटल्याने ती दुभाजकावर जाऊन आदळून समोरील रस्त्यावर पलटी झाली.

नाशिक : भिवंडीजवळ महामार्गावर रविवारी (ता १६) झालेल्या अपघातात जुने नाशिकमधील चौघे जागीच ठार झाले तर दोघे जखमी आहेत. इनोव्हा कारचे टायर फुटल्याने ती दुभाजकावर जाऊन आदळून समोरील रस्त्यावर पलटी झाली. या भीषण अपघातात जुने नाशिकमधील हुड्डा कुटुंबातील दोन महिलांसह लाखानी दांपत्य जागीच मृत्युमुखी पडले. अशा प्रकारे एकूण चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 नाशिकवरून मुंबईकडे निघालेल्या इनोव्हा (एम.एच.१५ बीयू ९९४) कारचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि इनोव्हा दुभाजकावर जाऊन आदळली आणि दुसर्या लेनवरून जाणाऱ्या ट्रकच्या समोर पलटी झाली.

या अपघातात जुने नाशिकमधील वडाळानाका येथिल हुड्डा कुटुंबातील दोन महिला परवीन नसरुद्दीन हुड्डा (५६), आफसिन मोहिद हुड्डा (२५), तर गुलशन बहादूर लाखानी (५३, शिंगाडा तलाव), बहादूर मुसाभाई लाखानी (५५, शिंगाडा तलाव) यांचा जागीच मृत्यू झाला. चालक मोहिद नसरुद्दीन हुड्डा व नसरुद्दीन सदरुद्दीन हुड्डा हे दोघेही गंभीर जखमी आहेत.

Web Title: nashik news four killed accident near bhivandi