आउटिंग, हॉटेलिंग करत  साजरा झाला ‘फ्रेंडशिप डे’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

नाशिक - ऑगस्टच्या पहिल्या रविवारची वाट पाहणाऱ्या तरुणाईमध्ये आज ‘फ्रेंडशिप डे’चा उत्साह पाहायला मिळाला. आजच्या दिवसाचे अनेकांनी पूर्वीपासूनच नियोजन करून ठेवले होते. मित्र-मैत्रिणींसोबत आठवणी टिपण्यासाठी भरपूर सेल्फी टिपल्या. कॉलेज रोडला सायंकाळी प्रचंड गर्दी झाली. आउटिंग, हॉटेलिंगसह मौजमजा करत तरुणाईने आजचा दिवस साजरा केला.

दोन-तीन दिवसांपासून पावसाने ओढ दिली असली, तरी सोशल मीडियावरून सकाळपासून शुभेच्छांचा पाऊस सुरू होता. कुणी व्हिडिओ, कुणी छायाचित्र तर कुणी संदेश पाठवत मैत्रीदिनाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. युवकांना या दिवसाची प्रतीक्षा होती. विविध प्रकारचे नियोजन यापूर्वीच करून ठेवले होते. अनेक युवक आज नाशिकजवळील पर्यटनस्थळांवर पोचले. गंगापूर रोडवरील नवशा गणपती, सोमेश्‍वर, बालाजी मंदिर परिसरासह गिरणारेपर्यंत युवक-युवतींची उपस्थिती होती. अनेक जण मॉलमध्ये फिरत खरेदीचा आनंद घेताना दिसले. सायंकाळी कॉलेज रोड परिसर तरुणाईने बहरला होता. हॉटेलमध्येही प्रचंड गर्दी बघायला मिळली. दरम्यान, तरुणाईवर वचक ठेवण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, पोलिस बंदोबस्त होता.

महाविद्यालयात आज जल्लोष
रविवारी महाविद्यालयांना सुटी असल्याने फ्रेंडशिप डे साजरा होत नाही. महाविद्यालयात शिकणाऱ्या मित्रांविषयी प्रेम व्यक्‍त करण्यासाठी दर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील आज (ता. ७) फ्रेंडशिप दिनाचा जल्लोष बघायला मिळणार आहे. त्यामुळे आजदेखील फ्रेंडशिप बॅण्डची खरेदी सुरू होती.

Web Title: nashik news Friendship Day