महापौर भानसी यांच्या हस्ते गंगापूर धरणाचे जलपूजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

नाशिक - यंदाच्या हंगामात चांगला पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा जलसाठा झाला आहे. त्यामुळे आज महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे विधिवत पूजन झाले. आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

नाशिक - यंदाच्या हंगामात चांगला पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा जलसाठा झाला आहे. त्यामुळे आज महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे विधिवत पूजन झाले. आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

गंगापूर धरणात ४३३३ दशलक्ष घनफूट (७६.९६ टक्के) पाणीसाठा झाला आहे. जून महिन्यातील संततधार, त्यानंतर पंधरा दिवसांपासून त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी तालुक्‍यांत पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. महापौर भानसी यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आले. राजाभाऊ खोचे, मुकुंद खोचे, प्रसाद खोचे, सुनील कावळे, अरुण जोशी यांनी पौरोहित्य केले.

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, मुशीर सय्यद, शशिकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सभागृहनेते दिनकर पाटील यांनी आभार मानले. उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, माजी महापौर अशोक मुर्तडक, गटनेते विलास शिंदे, रिपाइंच्या दीक्षा लोंढे, महिला व बालकल्याण समिती सभापती सरोज अहिरे, आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी, विधी समितीच्या सभापती शीतल माळोदे, शहर सुधारणा समितीचे सभापती भगवान दोंदे, पश्‍चिम प्रभाग समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील, प्रियंका माने, सातपूर प्रभाग समिती सभापती माधुरी बोलकर, नाशिक रोड प्रभाग समिती सभापती सुमन सातभाई, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, उपअभियंता आर. एस. पाटील, अविनाश धनाईत, बाजीराव माळी आदी उपस्थित होते.

Web Title: nashik news gangapur dam water poojan by mayor