घरकुल लाभार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

नाशिक - गंजमाळ येथील श्रमिकनगर झोपडपट्टीवासीयांसाठी चुंचाळे शिवारात घरकुल योजना राबविण्यात आली. घरकुलाची सोडत पुढील आठवड्यात काढली जाणार असून, त्याची नोटीस बजावली आहे. नोटिशीत सोडत योजनेत सहभाग न घेतल्यास घरकुलावरचा दावा रद्द होण्याचा इशारा देण्यात आल्याने श्रमिकनगरवासीयांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या दीपक डोके याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

पोलिस व सुरक्षारक्षकांनी तातडीने गुन्हा दाखल केला. श्रमिकनगर झोपडपट्टीवासीयांसाठी चुंचाळे शिवारात घरकुल योजना राबविण्यात आली; परंतु शहरातील मध्यवर्ती भाग सोडून लांब अंतरावर योजना राबविल्याने झोपडपट्टीवासीयांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने नागरिकांनी महापालिकेवर अनेकदा मोर्चे काढले आहेत. त्याच जागेवर घरे बांधून देण्याची मागणी केली. २४ तारखेला चुंचाळे शिवारातील घरकुलांसाठी सोडत काढली जाईल. 

Web Title: nashik news gharkul suicide