घोटीसह परिसराला पावसाने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

घोटी - घोटीसह परिसरात काल तीन तास जोरदार पाऊस झाला. यामुळे नाले, गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. शेतांमध्ये पाणी साचले होते. पावसामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.

दिवसभर भातलावणी सुरू होती. सायंकाळी साडेसहापासून जोरदार पावसाला सुरवात झाली. रात्री आठपर्यंत पावसाने परिसराला झोडपून काढले. मुंबई- नाशिक महामार्गावरील वाहतूक काहीकाळ संथगतीने सुरू होती. बाजारपेठेत व्यावसायिकांची धावपळ उडाली.

कामगार व बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.  पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

त्र्यंबकेश्‍वरला भाविकांचे हाल
त्र्यंबकेश्‍वर : येथे व परिसरात कालही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले. पूजा साहित्य विक्रेत्यांची धांदल उडाली. पावसामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यात शंभर वर्षांचे केलेले नियोजन एका वर्षात कोलमडले. गाजावाजा करून व करोडो रुपये खर्च करूनही पूर परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. 

वाडीवऱ्हेत जोरदार पाऊस
वाडीवऱ्हे : येथे व परिसरात सायंकाळी सहापासून जोरदार पावसाला सुरवात झाली. पावसामुळे बळीराजा सुखावला असून, भात लावणीला वेग येणार आहे. वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे ग्रामस्थ, शेतकरी, व्यापाऱ्यांची एकच धांदल उडाली.

Web Title: nashik news ghoti rain