पालकमंत्री गिरीश महाजन यांचे शहिदांच्या कुटुंबीयांसह स्नेहभोजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

नाशिक - प्रजासत्ताक दिनानिमित्त देशासाठी बलिदान केलेल्या जवानांच्या कुटुंबीयांसमवेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब स्नेहभोजन घेतले. प्रशासनातर्फे शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, साधना महाजन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे आदी उपस्थित होते. जिल्हाभरातून आलेल्या शहीदांच्या कुटुंबीयांनी मंत्रिमहोदयांशी संवाद साधला. मंत्री महाजन यांनी या कुटुंबीयांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

नाशिक - प्रजासत्ताक दिनानिमित्त देशासाठी बलिदान केलेल्या जवानांच्या कुटुंबीयांसमवेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब स्नेहभोजन घेतले. प्रशासनातर्फे शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, साधना महाजन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे आदी उपस्थित होते. जिल्हाभरातून आलेल्या शहीदांच्या कुटुंबीयांनी मंत्रिमहोदयांशी संवाद साधला. मंत्री महाजन यांनी या कुटुंबीयांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या वेळी शहीद यशवंत ढाकणे यांचे वडील अर्जुन ढाकणे, तळेगाव दिंडोरीतील शहीद शंकर शिंदे यांच्या वीरपत्नी सुवर्णा शिंदे, वडाळीभोईतील वीरपत्नी भागूबाई दराडे, कमल लहाने आदींसह ३५ शहीदांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Web Title: nashik news girish mahajan lunch with martyr family