मुंबईतील बॅंक दरोड्यातील सोने नाशिकमध्ये जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

नाशिक - गेल्या आठवड्यामध्ये मुंबईत बॅंक ऑफ बडोदाच्या लॉकर रुममध्ये भुयारी बोगदा करून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. हे चोरीचे सोने मालेगावसह नाशिकमधील भद्रकालीतून जप्त करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांचे विशेष शोध पथक गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्ये ठाण मांडून असून, आतापर्यंत तिघा सोनारांकडून चोरीचे सोने जप्त करण्यात आले आहे.

नवी मुंबई परिसरात गेल्या आठवड्यामध्ये बॅंक ऑफ बडोदामध्ये लगतच्या गाळ्यांमधून भुयार करून लॉकरमधून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही संशयितांनी अटक केली असून, चोरट्यांनी मालेगावसह मनमाड व नाशिकमधील भद्रकालीतील सराफी व्यावसायिकांना चोरीचे सोने विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मुंबईच्या गुन्हे शोध पथकाने मालेगावमधून दोघा सराफांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीचे अर्धा किलो सोने जप्त केले आहे.

नाशिकमधील भद्रकाली परिसरातून तीन सराफांकडूनही चोरीचे सोने जप्त केल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. यात आणखी काही सराफी व्यावसायिक सहभागी असण्याची शक्‍यता आहे. दोन आठवड्यांपूर्वीही तेलंगण पोलिसांनी चोरीच्या सोने खरेदीप्रकरणी नाशिकरोडच्या एका सराफाला ताब्यात घेतले होते.

Web Title: nashik news gold seized in bank robbery