आदिवासी खात्याच्या ऊर्जितावस्थेसाठी राज्यपालांना घालणार साकडे - पिचड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नाशिक - गेल्या तीन वर्षांतील आदिवासी खात्याचा कारभार निष्क्रिय झाला आहे. मृतावस्थेत चाललेल्या या खात्याला ऊर्जितावस्थेत प्राप्त करून देण्यासाठी येत्या पाच जूनला आदिवासी विकास परिषदेचे शिष्टमंडळ राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेणार आहे, अशी माहिती माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आज दिली.

पिचड म्हणाले, 'गेल्या तीन वर्षांत आदिवासी विकास खात्याला अवकळा आली आहे. जुन्या योजना गुंडळण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. धनगर समाजला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याचा घाट घालून असंतोष निर्माण केला आहे. याबाबत शासनाने राजकीय दडपशाहीने निर्णय घेऊ नये. याकडे राज्यपालांचे लक्ष वेधले जाणार आहे. गेल्या 19 वर्षांपासून "पेसा' कायद्यासाठी आम्ही पाठपुरावा केल्यानंतर तीन वर्षांपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली; मात्र 12 प्रकारच्या पदांवर आदिवासी तरुणांच्या भरतीकडे अजूनही दुर्लक्ष होत आहे. त्यांना नोकरी मिळाली तरच या कायद्याचा उपयोग होणार आहे.''

Web Title: nashik news governor recommend for tribal department energy