‘जीएसटी’मुळे गाळेभाड्यात तीन टक्के वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

नाशिक - देशात १ जुलैपासून सर्वत्र एक करप्रणाली लागू करण्यात आली. नव्याने आलेल्या करप्रणालीमुळे नाशिक महापालिकेच्या गाळ्यांच्या भाड्यामध्ये तीन टक्के वाढ झाली असून, हा दर १५ टक्‍क्‍यांवरून १८ टक्के वाढ करण्यात आला आहे. यामुळे अगोदरच कराच्या बोझाखाली दबलेले गाळेधारक आता अधिक आक्रमक होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. ‘जीएसटी’मुळे नाट्यगृहाच्या दरामध्येदेखील वाढ होणार असल्याने रसिकांच्या खिशालाही झळ बसणार आहे. 

संपूर्ण देशामध्ये १ जुलैपासून एक करप्रणाली लागू करण्यात आली. याचा फटका नाशिकमधील गाळेधारकांना बसला आहे. यापूर्वी महापालिका गाळेधारकांकडून महिन्यापोटी परिसरानुसार भाडे आकारत होती. यावर १५ टक्के अतिरिक्त कर वसूल करत होती. यातच त्यांच्याकडून रेडीरेकनरनुसारदेखील कर आकारला जात होता. त्यामुळे तो यापूर्वीच कराच्या बोझाखाली दबून गेला होता. 

आता नवीन करप्रणालीनुसार गाळेधारकांना १५ ऐवजी आता १८ टक्के कर भाड्याच्या स्वरूपात द्यावा लागणार आहे. महापालिकेच्या मालकीचे विविध भागांमध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक गाळे आहेत.

रसिकांच्या खिशालाही झळ
‘जीएसटी’मुळे सेवाकर, मनोरंजन करातही तीन टक्के वाढ करण्यात आली असून, नाट्यगृहाच्या तिकिटांचे दर वाढणार असल्याने रसिकांना आता तिकिटाच्या दरासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. सर्व मक्तेदारांना आता पैसे भरताना महापालिका क्रमांक आणि जीएसटी नोंदणी क्रमांक देणे बंधनकारक आहे.

Web Title: nashik news GST