अपंग प्रमाणपत्र वितरणास लागेना मुहूर्त..! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

जुने नाशिक - अपंगांना डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातून दर बुधवारी मोफत प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल, अशी घोषणा महापालिकेकडून करण्यात आली. त्यानंतर तीन बुधवार उलटले तरी अद्याप अपंग प्रमाणपत्र वितरणास मुहूर्त लागलेला नाही. सुविधांच्या अभावामुळे अपंगांना रुग्णालयात येऊनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. 

जुने नाशिक - अपंगांना डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातून दर बुधवारी मोफत प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल, अशी घोषणा महापालिकेकडून करण्यात आली. त्यानंतर तीन बुधवार उलटले तरी अद्याप अपंग प्रमाणपत्र वितरणास मुहूर्त लागलेला नाही. सुविधांच्या अभावामुळे अपंगांना रुग्णालयात येऊनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. 

दिव्यांगांना विविध प्रकारच्या सुविधा, योजनांना घेऊन आमदार बच्चू कडू यांनी महापालिका मुख्यालयात केलेल्या आंदोलनानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानी दिव्यांगांचे सर्वेक्षण केले. त्यांची नोंदणी केली. दिव्यांगांची वर्गवारी केली. शिवाय त्यांच्यासाठी विविध योजना निर्माण केल्या. त्याचप्रमाणे त्यांना शासनाच्या व महापालिकेच्या योजनाचा लाभ मिळावा, यासाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र महापालिकेतर्फे देण्याचे निश्‍चित करण्यात आले. दिव्यांग अपंग, मूकबधिर किंवा अंध असो त्याना बुधवार 7 मार्चपासून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातून अपंगांचे प्रमाणपत्र वितरण केले जातील, अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर 7 मार्च 14 मार्च या दोन बुधवारनंतर काल (ता. 21)चा तिसरा बुधवार उजाडला तरी अद्याप प्रमाणपत्र वितरणास मुहूर्त लागू शकला नाही. पहिल्या बुधवारी तांत्रिक कारणामुळे दोघांना कूपन देण्यात येऊन त्यांना पुढील बुधवारचा रस्ता दाखविण्यात आला. दुसऱ्या व तिसऱ्या बुधवारी शासनाच्या ज्या विभागाकडून प्रमाणपत्र वितरण केले जाते. त्या विभागाचे सर्व्हर डाउन असल्याने संगणक प्रणालीच सुरू होऊ शकली नाही. 21 मार्चला सर्व्हर डाउनची समस्या निर्माण झाल्याने रुग्ण, डॉक्‍टरसह अन्य कर्मचाऱ्यांना सकाळपासून दुपारपर्यंत ताटकळत राहावे लागले. शेवटी विभाग बंद करण्यात येऊन डॉक्‍टर, कर्मचारी तसेच रुग्णांनीही तेथून काढता पाय घेतला. 

अपंगांप्रमाणे विभागाची वाताहत 
शहरातील दिव्यांगांना अपंग प्रमाणपत्र वितरण करण्याच्या उद्देशाने डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात निर्माण करण्यात आलेला विभाग, रुग्णालयातील सुरक्षारक्षक व चौकशी कक्षात कार्यान्वित करण्यात आला आहे. तेथेच मोठी संगणक प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यासाठी वातानुकूलित कक्षासह महत्त्वाचे कागदपत्र ठेवण्याची योग्य अशी व्यवस्था असणे महत्त्वाचे होते. 

अपंगात्वाचा दाखला मिळविण्यासाठी सलग दोन बुधवारपासून चकरा मारत आहे. पण दोन्ही वेळा सर्व्हर डाउनची समस्या समोर आली आहे. यात सुधारणा होणे आवश्‍यक आहे. 
नंदू आरोटे, पीडित 

Web Title: nashik news handicap certificate Dr. Zakir Hussain Hospital