वीस टक्के करामुळे घर खरेदीचे स्वप्न धूसर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

नाशिक - एक देश- एक कर अशी घोषणा करताना केंद्र व राज्य सरकारने वस्तू व सेवाकर (जीएसटी) प्रणाली लागू केल्यानंतर घरांच्या किमती घटतील अशी अपेक्षा होती. पण उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी घर खरेदीवर १२.५ टक्के कर लागू व्हायचा. आता २० टक्के कर अदा करावा लागत असल्याने घरांच्या किमतींत वाढ झाली आहे.

केंद्र व राज्य सरकारने १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू केला. त्यापूर्वी नागरिकांना स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. पूर्वी १२.५ टक्‍क्‍यांपर्यंत कर अदा करावा लागत होता. आता जीएसटी १२टक्के आहे. त्याव्यतिरिक्त घरांची कागदपत्रे नोंदविताना पाच टक्के स्टॅम्पड्यूटी, लोकल बॉडी सेस, दस्तावेज नोंदणी प्रत्येकी एक टक्का अदा करावा लागणार आहे. 

शासनाने स्टॅम्पड्यूटीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आणखी एक टक्‍क्‍याने वाढ केली जाणार आहे. त्यामुळे पाचऐवजी सहा टक्के स्टॅम्पड्यूटी अदा करावी लागणार आहे.

अशी आहे कररचना
पूर्वीचे कराचे दर
 सर्व्हिस टॅक्‍स - ४.५ टक्के
 स्टॅम्पड्यूटी - ५ टक्के
 व्हॅट - १ टक्का
 दस्तावेज नोंदणी - १ टक्का
 एलबीटी - १ टक्का
सध्याचे कराचे दर
स्टॅम्पड्यूटी -  ५ टक्के
एलबीसी - १ टक्का
दस्तावेज नोंदणी - १ टक्का
जीएसटी - १२ टक्के

Web Title: nashik news home tax GST