‘होपिंग फ्लाइट’चा मार्ग नाशिकमधून मोकळा

‘होपिंग फ्लाइट’चा मार्ग नाशिकमधून मोकळा

नाशिक - केंद्र सरकारच्या ‘उडेगा देश का आम आदमी’ अर्थात, उडान योजनेच्या टप्पा क्रमांक २ मध्ये नाशिकचा समावेश झाला आहे. पाच विमान कंपन्यांनी नाशिकहून हवाईसेवा देण्याची इच्छा दाखविल्यानंतर देशातील सात महत्त्वाच्या शहरांची निश्‍चिती केली.

नाशिकहून अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, दिल्ली, गोवा, गाझियाबाद, हैदराबाद या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यास नागरी उड्डाण मंत्रालयाने परवानगी दिल्याने अनेक वर्षांपासून देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्याची मागणी करणाऱ्या नाशिककरांचे स्वप्न पूर्ण होईल. सेवा सुरू झाल्यानंतर नाशिकच्या विकासाला बूस्टर डोस मिळणार असल्याने औद्योगिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com