मक्का-मदिनात फडकला तिरंगा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नाशिक - यंदाच्या हज यात्रेस गेलेल्या भारतीय मुस्लिम यात्रेकरूंकडून सौदी अरेबियात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा झाला. सकाळच्या सुमारास भारतीय यात्रेकरूंसाठी तयार करण्यात आलेल्या तंबूसह परिसरात ठिकठिकाणी तिरंगा फडकावून देश व हुतात्म्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केल्याची माहिती हज कमिटीचे जिल्हा समन्वयक झहीर शेख यांनी दिली.

यंदा देशातून लाखावर भारतीय मुस्लिम यात्रेकरू हज यात्रेसाठी गेले आहेत. त्यातील सुमारे एक लाख भाविक सौदी-अरेबियातील मक्‍का-मदिना अर्थात, हज यात्रेच्या ठिकाणी पोचले आहेत. या वर्षाचे विशेष म्हणजे यंदा हज यात्रेदरम्यान स्वातंत्र्य दिन येत असल्याने येथे दाखल झालेल्या सर्व भारतीय यात्रेकरूंनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे ठरविले होते. काल (ता. १५) मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करत यात्रेकरूंसाठी मुख्य दर्शनाच्या ठिकाणापासून काही अंतरावर यात्रेकरूंच्या निवासासाठी उभारण्यात आलेल्या तंबूंसह परिसरात ठिकठिकाणी तिरंगा फडकविला. 

Web Title: nashik news Indian Muslims