सराफ व्यावसायिक अपहरणातील गूढ कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

नाशिक रोड - राहुल शहाणे यांच्या अपहरणाच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांनी बंद पाळला. देवी चौकातील धनश्री ज्वेलर्सचे मालक राहुल शहाणे यांना शुक्रवारी (ता. २७) त्यांच्या दुकानातून हैदराबादचे पोलिस असल्याचे सांगून अपहरण केल्यानंतरही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. अपहरणकर्त्यांकडून दागिने व रकमेची मागणी केली जात असल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे. 

या घटनेची दखल राज्यातील सुवर्णकार समाज व सराफ असोसिएशनने घेतली असून, मंगळवारी (ता. ३१) नगर येथे तातडीने बैठक बोलविली आहे. बैठकीत असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंग राका व इतर पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीस अध्यक्ष मिलिंद दंडे, राहुल महाले आदी उपस्थित राहणार आहेत.

शहाणे यांचे अपहरण होऊन दोन दिवस झाले आहेत. पोलिसांचे पथक हैदराबाद येथे रवाना झाले. पथकाने हैदराबाद व सिकंदराबाद येथील पोलिस ठाण्यांना भेट देत चौकशी केली. मात्र, शहाणे यांचा ठावठिकाणा समजू शकला नाही. अपहरणकर्ते शहाणे यांच्या नातेवाइकांना शहाणे यांच्याच मोबाईलवरून संपर्क साधत असल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे.

Web Title: nashik news jeweller kidnapping