द्वारका चौकात लेफ्ट फ्री रस्ता, कन्नमवार पुलाची निर्मिती - आमदार फरांदे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

नाशिक - मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक हद्दीत सुचविलेल्या तब्बल बारा दुरुस्त्यांना अखेरीस मुहूर्त मिळाला. द्वारका येथील वाहतुकीवर तोडगा काढण्यासाठी लेफ्ट फ्री रस्त्याची निर्मिती, कन्नमवार पुलाची पुनर्निमिती, इंदिरानगर बोगद्याजवळील दुरुस्ती व कमोदनगर व स्टेट बॅंक चौकामध्ये भुयारी मार्गाची निर्मिती ही महत्त्वाची कामे केली जाणार असल्याची माहिती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी माहिती दिली. बारा कामांसाठी तब्बल ६७ रुपये खर्च येणार असून, दोन वर्षांत कामे मार्गी लागणार आहेत.

विल्होळी ते आडगावदरम्यान उड्डाणपुलाची निर्मिती केल्यानंतर वाहतुकीसंदर्भात अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यात द्वारका येथे वारंवार वाहतूक ठप्प होणे, इंदिरानगर बोगद्यामुळे नागरिकांना अतिरिक्त चार ते पाच किलोमीटरचा फेरा, पंचवटी महाविद्यालयासमोर क्रॉसिंग नसल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ, द्वारका व गोविंदनगरव्यतिरिक्त उड्डाणपुलावर वाहने चढविण्यासाठी एंट्री पॉइंट व एक्‍झिट पॉइंट नसल्याने उड्डाणपुलाचा उपयोग होत नव्हता. या सर्व समस्यांचा विचार करून आमदार फरांदे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन वाहतूक समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यानुसार विविध प्रकारच्या बारा कामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी ६७ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली. महिनाभरात ही कामे सुरू होणार आहेत. द्वारका चौकातील वाहतुकीवर मार्ग काढण्यासाठी नाशिक रोडच्या बाजूकडील भुयारी मार्गाचा सब-वे पुढे वाढवून डाव्या बाजूने वडाळा नाक्‍याकडे जाणारी वाहतूक वळविली जाणार आहे. या भागातील अतिक्रमण काढले जाणार असल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले.

महामार्गाच्या नूतनीकरणात
पंचवटी महाविद्यालयासमोर भुयारी मार्गाच्या स्वरूपात रोड क्रॉसिंग. 
कन्नमवार पूल तोडून नवीन पुलाची उभारणी.
द्वारका चौकातील नाशिक रोड भागाकडील सब-वे पुढे करून वाहतूक मार्गाची निर्मिती.
इंदिरानगर बोगद्याजवळील सर्व्हिस रोड व मुख्य रस्त्यावरील जाळी मागे घेणार.
कमोदनगर येथे पायी जाणाऱ्यांसाठी भुयारी मार्ग.
लेखानगर उड्डाणपुलाखाली यू-टर्न.
स्प्लेंडर हॉलसमोर एक्‍झिट रस्ता निर्मिती. 
स्टेट बॅंक चौक सर्व्हिस रोडवर एंट्री रस्ता बनविणे.
स्टेट बॅंक चौकात भुयारी मार्गाची निर्मिती. 
हॉटेल सेव्हनहेवनसमोर मुख्य रस्त्याला जोडणारा एंट्री रस्ता.
गॅब्रिएल कंपनीजवळील सर्व्हिस रोडवर एंट्री रस्ता बनविणे. 
विल्होळी येथे गाड्यांसाठी भुयारी मार्ग बनविणे.

Web Title: nashik news kannamwar bridge making in nashik