'जीएसटी'मुळे रॉकेल महागले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

नाशिक - शिधापत्रिकेवरील साडेतीन टक्के सेवाकराच्या जागी पाच टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्याने रॉकेल सरासरी 35 ते 40 पैशांनी महागणार आहे.

नाशिक - शिधापत्रिकेवरील साडेतीन टक्के सेवाकराच्या जागी पाच टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्याने रॉकेल सरासरी 35 ते 40 पैशांनी महागणार आहे.

रॉकेलच्या डेपोपासून तर लाभार्थ्यांपर्यंत ते वाहतूक करण्याच्या भाड्याच्या खर्चातील फरकानुसार रॉकेलदर वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न आहेत. सरासरी 20 रुपये 90 पैसे ते 22 रुपये प्रतिलिटर याप्रमाणे शिधापत्रिकाधारकांना रॉकेल मिळते. आतापर्यंत रॉकेलवर साडेतीन टक्के दराने सेवाकर आकारला जायचा. मात्र आता त्याजागी पाच टक्के जीएसटी लागू झाला आहे. परिणामी, दीड टक्‍क्‍याने रॉकेल महागले आहे. त्यामुळे प्रतिलिटर 35 ते 40 पैशाने रॉकेल महागणार आहे.

Web Title: nashik news kerosene rate increase by gst

टॅग्स