बेपत्ता विद्यार्थी घरी परतल्याने पालकांनी टाकला सुटकेचा निःश्वास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

मुलांनी घेतलेल्या फिरायला जाण्याच्या निर्णयाने पालकांसह परिसरातील ग्रामस्थानी मोठे आश्चर्य व्यक्त केले असले तरी मुले घरी आल्याने पालकांसह शाळेतील सर्वच पालकांच्या मनातील भरलेली धडकी कमी झाली आहे मात्र या पुढे मुलांनी असे करून नये यासाठी पालकांनीही जागरूक पाहण्याची गरज व्यक्त केली आहे.

लखमापूर  : दिंडोरी येथील मराठा विद्या प्रसारक (मविप्र) जनता इग्लिश स्कूलमधील इयत्ता नववीत शिकणारे बेपत्ता झालेले चार विद्यार्थी गुरुवारी रात्री उशीरा घरी परतले आहेत. हे चौघेही जण शाळेत जातो असे सांगून सापुतारा येथे फिरायला गेल्याची माहिती समोर आली आहे. मुलं घरी सुखरुप पोचल्यानं पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मविप्र जनता स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेणारे दीपक कडाळे, जीवन बल्हाळ हे दोघं जण दिंडोरी येथे राहतात तर तळेगावात राहणारा अमोल सुदाम चौधरी व लखमापूर (ओझरखेड कॉलनी शिवार) कुलदीप सुनिल देशमुख हे चारही जण शाळेत जातो असे सांगून गुरुवारी (13 जुलै ) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घरातील निघाले. पण शाळेत न जाता ते सापुतारा येथे फिरण्यास गेले.  
 
संध्याकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर मुले घरी परतली नाहीत. म्हणून पालकांनी शोधाशोध सुरू केली असता चारही मुले बेपत्ता झाल्याचे उघड झाले. राञी उशीरा दिंडोरी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. पोलिसांचं एक पथक सापुतारा येथे रवाना करण्यात आले.  पण यावेळी दिवसभर सापुतारा येथे निसर्ग दर्शन करत हे चारही जण रात्री एक वाजता घरी पोहोचले. सापुतारा येथे फिरायला जाऊ व पाच वाजेपर्यंत परत येऊ हा त्यांचा अंदाज चुकला व ते रात्री उशीरा घरी पोचले. 
दरम्यान मुलांनी घेतलेल्या फिरायला जाण्याच्या निर्णयाने पालकांसह परिसरातील ग्रामस्थानी मोठे आश्चर्य व्यक्त केले असले तरी मुले घरी आल्याने पालकांसह शाळेतील सर्वच पालकांच्या मनातील भरलेली धडकी कमी झाली आहे मात्र या पुढे मुलांनी असे करून नये यासाठी पालकांनीही जागरूक पाहण्याची गरज व्यक्त केली आहे.

ई सकाळवरील आणखी बातम्या : 
काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा
अडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम
बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत
कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त

Web Title: nashik news lakhmapur missing school boys returned