सावकीपाडा खून प्रकरणी दोघा भावांना जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

नाशिक - सावकीपाडा (ता. देवळा) शिवारात 2014 मध्ये शेतातील जलवाहिनी फुटल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून खुनाबद्दल जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघा भावांना गुरुवारी (ता. 22) जन्मठेप आणि 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील एका संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. 

नाशिक - सावकीपाडा (ता. देवळा) शिवारात 2014 मध्ये शेतातील जलवाहिनी फुटल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून खुनाबद्दल जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघा भावांना गुरुवारी (ता. 22) जन्मठेप आणि 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील एका संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. 

सावकीपाडा येथे 8 डिसेंबर 2014 ला संदीप गोपाल शुक्‍ल (वय 29, रा. सावकीपाडा, ता. देवळा. मूळ रा. माळीवाडा, औरंगाबाद) हा पत्नी अश्‍विनीसह सावकीपाडा येथे बहीण मंगला शांतिलाल पाठक यांच्याकडे शेतीकाम करून राहत होता. 8 डिसेंबरला सकाळी तो दुचाकीवरून शेतातील रस्त्याने येत असता दुचाकी घसरली. त्यामुळे आरोपी तिवारी यांच्या शेतातील पाण्याची जलवाहिनी फुटली. त्यावरून कैलास तिवारी, सुमीत तिवारी व राहुल तिवारी यांनी संदीप शुक्‍ल याच्याशी वाद घातला. तिवारी वाद मिटल्यानंतर पाठक यांच्या घरी आले आणि वादावादी सुरू झाली. या वेळी आरोपी सुमीत तिवारी याने कुऱ्हाडीने शांतिलाल पाठक, संदीप शुक्‍ल यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले, तर राहुल तिवारी यानेही लाठ्याकाठ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. या प्रकरणी देवळा पोलिसांत प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला. संदीप शुक्‍ल याला नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, 9 डिसेंबर 2014 ला उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल झाला. 

या प्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालून न्यायाधीश एस. एस. पांडे यांनी सबळ पुराव्यांनुसार सुमीत व राहुल तिवारी या दोघा भावांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व 35 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. कैलास तिवारी यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ऍड. सुनील सरोदे यांनी कामकाज पाहिले. 

Web Title: nashik news life imprisonment for two brothers