पावसामुळे वीज मागणी घटल्याने भारनियमन काहीअंशी सुसह्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

राज्यात वीज मागणीत १२०० मेगावॉटने घट
नाशिक - औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचा कोळशाचा पुरवठा अजूनही पूर्ववत झाला नसल्याने राज्यात भारनियमनाची स्थिती कायमच आहे. पण त्याच वेळी दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात सुरू झालेल्या संततधारेमुळे भारनियमनाच्या दाहकतेला ‘ब्रेक’ लागला. परिणामी राज्यातील विजेची मागणी १२०० मेगावॉटच्या आसपास घटल्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रात कालपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी सुरू केली. पुढील सहा तास मुसळधारेचा हवामान विभागाचा अंदाज आहे. नाशिक, नगर, धुळे या तीन जिल्ह्यांत आज ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.

साधारण १.८ मिलिमीटर पाऊस झाला. इतर अनेक तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावली नसली तरी ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरणामुळे आर्द्रता कमी होण्यास आणि त्यामुळे विजेच्या मागणीत किंचतशी का होईना घट होण्यास मदत झाली. नाशिकला मात्र सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणातील दाहकता आणि काही अंशी भारनियमनाची तीव्रता कमी होण्यास मदत झाली.

पावसाने विजेची मागणी किंचित घटण्याने हा दिलासा मिळाला. राज्यात आज विजेची मागणी १६,५०० ते १७,८०० मेगावॉट विजेची मागणी असून, विजेची उपलब्धता १५,७०० मेगावॉट झाली. पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून दुपारनंतर तापमानात घट होत आहे. त्यामुळे पंखे, वातानुकूलित यंत्रणेसह विद्युत उपकरणांना लागणाऱ्या विजेच्या मागणीत घट होते आहे. त्यामुळे भारनियमन काहीअंशी सुसह्य ठरत आहे. 

नाशिकला १५० मेगावॉटचा दिलासा
नाशिक जिल्ह्यात आज शनिवारी विजेची मागणी सुमारे १२०० मेगावॉट होती. विजेची उपलब्धता साधारणतः १०६० ते १०७० मेगावॉट होती. त्यामुळे १३० ते १४० मेगावॉट इतकी जिल्ह्यात विजेची तूट आहे. काल हीच तूट २७५ ते कमाल ३०० मेगावॉटपर्यंत पोचली होती. दोन दिवसांच्या परतीच्या पावसामुळे साधारण १५० मेगावॉट इतकी जिल्ह्यातील भारनियमनाची तीव्रता कमी झाली. दरम्यान, आजची जिल्ह्यातील सुमारे १३० ते १४० मेगावॉट विजेची तूट भरून काढण्यासाठी ग्रामीण आणि कृषीसह जास्त थकबाकीच्या गटातील फीडरवर भारनियमन झाले.

Web Title: nashik news loadhshading