शेतकऱ्याने घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

मालेगाव (नाशिक) - नगदी पीक असलेल्या कापसाला बोंड अळीने फस्त केल्याने हातातोंडाशी आलेला घास गेला. यातच कर्जाचा डोंगर, हातउसनवारी यामुळे एकत्रित मोठ्या कुटुंबाची होत असलेली ओढाताण, कर्जबाजारीपणा, पाणीटंचाई व नापिकीला कंटाळून भूषण उर्फ सोनू दगा ठोके (वय 28, रा. नांदगाव, ता. मालेगाव) या तरुण शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (ता.23) पहाटे नांदगाव-सौंदाणे रस्त्यावर पीरसाहेब मंदिराजवळ हा प्रकार घडला.
Web Title: nashik news malegaon news farmer suicide