सर्जा- राजाच्या सणासाठी बाजारात गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पूर्वसंध्येला बळीराजाची तयारी; मातीच्या बैलांनाही मागणी

नाशिक - वर्षभर शेतीसाठी अपार कष्ट करून आपला मळा फुलविणाऱ्या सर्जा- राजाच्या सणासाठी बळीराजाची शहरात खरेदीसाठी लगबग दिसून आली. पोळ्याच्या पार्श्‍वभूमीवर बैलजोडी खुलून दिसावी, यासाठी शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. 

पोळ्याच्या पूर्वसंध्येपर्यंत शेतकरी सर्जा- राजाच्या सजावटीचे साहित्य खरेदी करीत होते. रविवार कारंजा, मेन रोड, पंचवटी परिसरात मातीचे बैल तीस रुपयांना पाच, तर चिनी मातीचे बैल तीसला जोडी अशी उपलब्ध होती. पूजेतील मुख्य असलेले सवट दहा रुपयांपासून उपलब्ध होते. पर्यावरणपूरक मातीच्या बैलांना यंदा विशेष मागणी आहे. चिनी मातीची बैलजोड आणि घोडा विविध कलाकुसरीच्या वस्तू ७०० रुपयांपर्यंत उपलब्ध होत्या.

शहरीकरणामुळे शेतीशी फारसा संबंध येत नसलेल्या बच्चेकंपनीचा मातीचे बैल खरेदीसाठी विशेष उत्साह होता. शहराला जोडून असलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची शहरात खरेदीसाठी गर्दी होती. काळानुसार पोळ्याच्या साहित्यातही नावीन्य आल्याने आकर्षक साहित्यांना मोठी मागणी होती. 

रेशम, घुंगरू यांचा वापर करून सजावटीचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांकडून मागणी आहे. रसायनयुक्त रंगांना पर्याय म्हणून अनेक पर्यावरणपूरक आणि बैलांना इजा होऊ नये अशा प्रकारचे रंगही उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत किमतींमध्ये फारसा फरक पडला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.  
- केशव आल्हाट, विक्रेते

केसऱ्या - ५० रुपये 
घुंगरू दोर -  ५० रुपये 
वेसण - ५० रुपयांपासून पुढे 
गोंडे - १५० रुपये जोडी 
मोरक्‍या - १२० रुपये जोडी
मातीचे बैल - ३० रुपयांना पाच 
चिनी मातीचे बैल - ३० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत जोडी  

Web Title: nashik news market full rush for bail pola festival