"मुक्त'च्या एम.फिल., पीएच.डी.ला मान्यता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला नियमित पूर्णवेळ/अर्धवेळ नियमित पद्धतीने एम.फिल. आणि पीएच.डी. संशोधन शिक्षणक्रम सुरू करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मान्यता दिली. या संदर्भात यूजीसीने नुकतेच विद्यापीठाला पत्र पाठविले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावरील विद्यार्थ्यांना संशोधनपर उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, एम.फिल. आणि पीएच.डी. संशोधन शिक्षणक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्देशित केल्यानुसार एम.फिल. आणि पीएच.डी. शिक्षणक्रमांची संरचना आणि कार्यपद्धती विद्यापीठाला बंधनकारक असेल. यूजीसीच्या 2016 च्या निर्देशानुसार विद्यापीठाला हे दोन्ही संशोधन शिक्षणक्रम सुरू करण्यास मान्यता दिली.

Web Title: nashik news m.phil phd permission