एमपीएससीच्या पेपरला परीक्षार्थींना फुटला घाम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएमसी) घेण्यात आलेल्या विविध पदांसाठीच्या पूर्वपरीक्षेत आज एका तासात शंभर प्रश्‍न सोडवायचे असल्याने अचूक उत्तर नोंदविताना वेळेत प्रश्‍नपत्रिका सोडवून पूर्ण करण्यात परीक्षार्थ्यांना घाम फुटला होता. काही प्रश्‍न अत्यंत कठीण असल्याने पेपर सोडविण्यासाठी बराच वेळ लागत असल्याचे परीक्षार्थ्यांनी सांगितले. 

पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी या पदांसाठी संयुक्‍त पूर्वपरीक्षा घेतली जात असते. आयोगामार्फत आज राज्यात पूर्वपरीक्षा 2017 झाली. साठ मिनिटांत शंभर प्रश्‍न सोडवायचे असल्याने एका मिनिटात साधारणत: दोन प्रश्‍न या गतीने पेपर सोडवावा लागत होता. त्यातच काही प्रश्‍नांचे स्वरूप मोठे असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांना पूर्ण प्रश्‍नपत्रिका सोडवता आली नाही, तर "निगेटिव्ह मार्किंग'मुळे काही विद्यार्थ्यांनी माहीत असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहिण्यास पसंती दर्शवली. 

Web Title: nashik news MPSC exam