परिवहनची शनिवारपासून दोन दिवस परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

नाशिक - राज्य परिवहन महामंडळातर्फे शनिवार (ता. 28) व रविवार (ता. 29) अशी दोन दिवस सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, लेखाकार आदी नऊ पदांसाठी परीक्षा होत आहे.

नाशिक - राज्य परिवहन महामंडळातर्फे शनिवार (ता. 28) व रविवार (ता. 29) अशी दोन दिवस सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, लेखाकार आदी नऊ पदांसाठी परीक्षा होत आहे.

पाच जानेवारीला प्रसिद्ध जाहिरातीला प्रतिसाद देत वेगवेगळ्या 16 पदांसाठी 14 हजार 253 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. परीक्षेची तारीख व ठिकाण उमेदवारांना परीक्षेच्या पंधरा दिवस आधी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, अशी सूचना देण्यात आली. मात्र, येत्या शनिवारी (ता. 28) व रविवारी (ता. 29) परीक्षा होत असून, अवघ्या तीन दिवसांपूर्वी परीक्षेबाबत माहिती मिळाल्याने उमेदवारांची तारांबळ उडाली आहे.

या परीक्षांनंतर केवळ लिपिक (क्‍लर्क) पदाची परीक्षा शिल्लक राहणार आहे. या पदाच्या दोन हजार 548 पदांसाठी राज्यभरातून एक लाख 75 हजार 695 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यापूर्वीचा अनुभव पाहता पावणेदोन लाख उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षेची तारीख पंधरा दिवस आधी कळवली जावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

Web Title: nashik news msrtc exam