‘एमटीडीसी’चे गंगापूर धरण परिसरात पंचतारांकित ‘ग्रेप रिसॉर्ट’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नाशिक - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी)काळानुरूप बदल स्वीकारत आता पंचतारांकित  रिसॉर्टकडे वाटचाल सुरू केली आहे. ‘ग्रेप रिसॉर्ट’ नावाने उत्तर महाराष्ट्रातील हे पहिले तारांकित रिसॉर्ट मार्चअखेर गंगापूर येथे नाशिककरांच्या सेवेत रुजू होण्याची शक्‍यता आहे. साडेबारा कोटींची तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे.

पर्यटन विकास महामंडळाची नाशिक विभागात फक्त त्र्यंबकेश्‍वर, शिर्डी, भंडारदरा, तोरणमाळ व जळगाव येथे सध्या साधी रिसॉर्ट आहेत. तीही जुनी झाली आहेत. त्यातही शिर्डी व भंडारदरा येथील रिसॉर्ट महामंडळ स्वतः चालविते. बाकी सर्व महामंडळाने भाडे कराराने दिली आहेत. आजपर्यंत उच्चाधिकारी व पदाधिकारी, उद्योजक यांना साजेसे तारांकित रिसॉर्ट उत्तर महाराष्ट्रात महामंडळाचे कोठेच नसल्याने खासगी तारांकित हॉटेल्सचा पर्याय स्वीकारावा लागत होता. तेथे सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होत असे. नाशिकमधील ही वाढती गरज लक्षात घेऊन गेल्या तीन वर्षांपूर्वी पर्यटन विकास महामंडळाने केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून तारांकित (स्टार) रिसॉर्टचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार गंगापूर धरणाला लागूनच फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलच्या मागे हे तारांकित रिसॉर्ट साकारण्यात आले आहे.

पर्यटनवाढीसाठी...
आतापर्यंत १२ कोटी ३२ लाख रुपये त्यावर खर्च झाले आहेत. सर्व अत्याधुनिक सोयींनीयुक्त २८ खोल्या आहेत. चार स्वतंत्र मोठे बंगले आहेत. समोर सायकल व जॉगिंग ट्रॅक, बगीचा, स्वीमिंग पूल व रेस्टॉरंटची व्यवस्था करण्यात आली आहे. निसर्गरम्य मोकळ्या वातावरणात व गंगापूर धरणाच्या काठावर निवांत राहण्याची सोय येथे करण्यात आली आहे. मार्चअखेरीस हे काम पूर्ण होणार असून, त्यानंतर उद्‌घाटन होऊन ते नागरिकांसाठी खुले होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील या पहिल्याच तारांकित रिसॉर्टला ‘ग्रेप रिसॉर्ट’ नाव देण्यात आले आहे. 

Web Title: nashik news MTDC