संगीताच्या तालावर मडबाथचा आनंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पंचवटी - पेठ रोडवरील तवली फाट्याजवळ रविवारी मडबाथचा आबालवृद्धांसह हजारो लोकांनी संगीताच्या तालावर थिरकत आनंद लुटला. शरीरावर चिखलाचा थर पाहून दुर्गम भागातून आलेले हे लोक तर नसावेत, अशी शंका रस्त्याने जाणाऱ्यांकडून व्यक्त होत होती. संपूर्ण अंगाला चिखल लावल्यामुळे जवळच्या आप्तांना ओळखणेही कठीण जात होते. या उपक्रमाचे हे विसावे वर्ष असून, नाशिक शहरातील नामवंत नागरिक यात सहभागी होतात. 

महेशभाई शहा, चिराग शहा, तसेच योगशिक्षक व भाजपचे नेते नंदू देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वीस वर्षांपासून हा आगळावेगळा उपक्रम राबविला जातो. विशेष म्हणजे मडबाथचा आनंद लुटण्यासाठी नाशिकसह मुंबई, पुणे, तसेच राज्याच्या काही भागांतील अंदाजे हजार नागरिक सहभागी झाले होते. हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी हा कार्यक्रम घेण्यात येतो. महिनाभर आधीपासून या कार्यक्रमाची तयारी केली जाते. त्यासाठी खास वारुळाची माती गोळा केली जाते. आठ दिवस आधी ही माती भिजवली जाते. संपूर्ण शरीराला लावून अंघोळ करण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे, त्याने शरीरातील सर्व उष्णता निघून जाते. त्वचा चकचकीत होते, असे संयोजक देसाई यांनी सांगितले.

Web Title: nashik news mudbath music

टॅग्स