महापालिकांच्या 8 जागांच्या पोटनिवडणुकांची तयारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

नाशिक - नगरसेवकांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यातील नाशिकसह सात महापालिकातील पोटनिवडणुकांच्या आठ जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. यासंदर्भातील आदेश आज काढण्यात आले. राज्यातील नाशिक 13-क, सोलापूर 14-क, जळगाव 26-ब, पुणे 22-क, बृहन्मुंबई 173, नगर 32-ब आणि 34-ब उल्हासनगर 17-ब या प्रभागात पोटनिवडणुका होणार आहेत.

एप्रिल 2018 मध्ये या निवडणुकांसाठी 10 जानेवारी 2018 ही तारीख ग्राह्य धरून प्रसिद्ध झालेली मतदार यादी तयार करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार 17 फेब्रुवारीला प्रारूप यादी प्रसिद्ध करणे, 17 ते 26 फेब्रुवारीला मतदार यादीवर हरकती मागविणे, 27 फेब्रुवारीला मतदार केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे त्यानंतर 8 मार्च प्रभाग आणि मतदार केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करणे याप्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: nashik news municipal by election