महापालिका मुख्यालयाला आता खासगी सुरक्षारक्षकांचा वेढा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

नाशिक - महापालिका मुख्यालयात सुरक्षारक्षक असले, तरी नगरसेवकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांपुढे त्यांचे काहीच चालत नाही. बाहेरून येणारी व्यक्तीही दादागिरी करून जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेची सुरक्षा खासगी शस्त्रधारी सुरक्षारक्षकांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात घेतलेला हा निर्णय आहे. प्रायोगिक तत्त्वावर ४५ सुरक्षारक्षक नियुक्त केले जाणार आहेत. गेल्या महिन्यात आमदार बच्चू कडू व आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात झालेला वाद यामागे असल्याचे बोलले जात आहे.

महापालिका मुख्यालयात स्वतःचे सुरक्षारक्षक असले, तरी ती संख्या अपुरी आहे. त्याशिवाय पालिकेचे सुरक्षारक्षक नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांना, तसेच पुरेशी सुरक्षा पुरविण्यास असमर्थ असल्याचा निष्कर्ष काढत खासगी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपंगांच्या प्रश्‍नांवर आमदार कडू व आयुक्त कृष्णा यांच्यात वाद झाला होता. दोन दिवसांपूर्वी लिलावावरून एकाला पालिकेच्या आवारातच मारहाण झाली होती. 

निवडणुकीच्या कालावधीत एका व्यक्तीने चाकूसह प्रवेश केला होता. वाढत्या गुन्ह्याच्या घटनांमुळे सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले होते. याशिवाय शासनाने कर्मचारी भरतीवर बंदी आणली आहे. सुरक्षा महामंडळाकडून ४५ शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. सुरक्षारक्षकांना २३ ते ४० हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

Web Title: nashik news The municipal headquarters is now surrounded by private security forces