नाशिक: खरेदी-विक्रीच्या वादातून झालेल्या मारहाणीत विक्रेत्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

शहरातील त्र्यंबक रस्त्यावरील वेद मंदिराजवळ खरेदी विक्रीच्या वादातून झालेल्या मारहाणीत गॉगल विक्रेता एतेशाम अन्सारी (वय 23) याचा उपचारादारम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाशिक - शहरातील त्र्यंबक रस्त्यावरील वेद मंदिराजवळ खरेदी विक्रीच्या वादातून झालेल्या मारहाणीत गॉगल विक्रेता एतेशाम अन्सारी (वय 23) याचा उपचारादारम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मारहाणीची ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. गॉगल खरेदी करायला आलेल्या टोळक्‍याशी अन्सारी याचा वाद झाला. त्यानंतर टोळक्‍याने अन्सारीला जबर मारहाण केल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर जखमी अन्सारीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना आज (मंगळवार) सकाळी त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजल्यानंतर अन्सारीच्या नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

आधी जिल्हा शासकीय रुग्णालय व नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना आज सकाळी नऊ वाजता अन्सारी याचे निधन झाले. ही घटना समजल्या नंतर नातेवाईक, मित्रांनी रुग्णालयात गर्दी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अद्याप पर्यंत या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नाही.

Web Title: nashik news murder goggle saler breaking news crime marathi news

टॅग्स