भावजयीचा गळा आवळून दिराचा गळफास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

नाशिक - पंचवटीतील मेरी-रासबिहारी रोड परिसरात काल (ता. २३) मध्यरात्रीच्या सुमारास भावजयीचा गळा आवळून दिरानेही गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी, दिरानेच भावजयीचा खून केल्याचा संशय व्यक्‍त केला आहे. प्रियासिंग विकासकुमार शर्मा (वय २७) व श्रीरामकुमार सतेंद्र शर्मा (वय २५, दोघे मूळ रा. नालंदा, बिहार) अशी मृतांची नावे आहेत.

मेरी-रासबिहारी लिंक रोडवर लक्ष्मी रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये विकासकुमार शर्मा पत्नी व भावासमवेत राहतात. बुधवारी ते बाहेरगावी गेले होते. मध्यरात्री जेव्हा ते परत आले, त्या वेळी घरात त्यांची पत्नी प्रियासिंग शर्मा यांचा मृतदेह जमिनीवर, तर भाऊ श्रीरामकुमारचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. प्राथमिक तपासानुसार श्रीरामकुमारने भावजय प्रियासिंग यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली असावी व त्यानंतर स्वत: गळफास घेतला असावा, असा संशय व्यक्त केला आहे.

प्रियासिंग यांच्या गळ्यावर दोरीने आवळल्याच्या खुणाही आढळून आल्या आहेत. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या याबाबतचे गूढ मात्र कायम आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत. 

दरम्यान, या प्रकरणी विकाससिंग यांनी पोलिसांत फिर्याद दिलेली नसल्याने, आकस्मात नोंद करण्यात आलेली आहे. तर, वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे. 

श्रीरामकुमारच्या अंगावर ओरखडे
मृत प्रियासिंग व श्रीरामकुमार शर्मा यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले असून, यातून ठोस माहिती समोर आली आहे. या वैद्यकीय अहवालानुसार, प्रियासिंग यांचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे सिद्ध होत आहे, तर श्रीरामकुमार याने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, त्याच्या शरीरावर प्रियासिंग यांच्या नखांचे ओरखडे आहेत. त्यामुळे त्यांनी प्रतिकार करतानाचे ते ओरखडे असण्याची शक्‍यता आहे. तसेच मृतदेहांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

Web Title: nashik news murder & suicide