संपात सहभागी शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

येवला तालुक्‍यातील पिंपरी येथील तरुण शेतकरी नवनाथ चांगदेव भालेराव यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक : येवला तालुक्‍यातील पिंपरी येथील तरुण शेतकरी नवनाथ चांगदेव भालेराव यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नवनाथ हे येवला-लासलगाव रस्त्यावरील पिंपरी फाटा येथे सोमवारी झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभागी होते. सोमवारी रात्री अकरा वाजता त्यांनी कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह येवला येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Web Title: Nashik news nashik breaking news farmer suicide marathi news sakal news