चोवीस तास पाणी, शाश्‍वत बससेवा अन्‌ डिजिटल शाळा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

नाशिक  - अवास्तव योजनांना फाटा देऊन लोकोपयोगी योजनांचा समावेश करत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी (ता. 22) 2018-19 या आर्थिक वर्षाचे एक हजार 785 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. "अंथरूण पाहून पाय पसरावे' या म्हणीला साजेसे आर्थिक नियोजन करताना शहरवासीयांना चोवीस तास पाणी, शाश्‍वत बससेवा, नवीन वसाहतींत पथदीप, रस्ते, ड्रेनेज सुविधा देण्याबरोबरच महापालिकेचा कारभार डिजिटल करण्यावर भर दिला आहे. विद्यार्थी केंद्रभूत मानून पालिकेच्या शाळा डिजिटल करण्याबरोबरच स्वच्छतेसाठी कचरा विलगीकरण बंधनकारक केले आहे.

नाशिक  - अवास्तव योजनांना फाटा देऊन लोकोपयोगी योजनांचा समावेश करत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी (ता. 22) 2018-19 या आर्थिक वर्षाचे एक हजार 785 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. "अंथरूण पाहून पाय पसरावे' या म्हणीला साजेसे आर्थिक नियोजन करताना शहरवासीयांना चोवीस तास पाणी, शाश्‍वत बससेवा, नवीन वसाहतींत पथदीप, रस्ते, ड्रेनेज सुविधा देण्याबरोबरच महापालिकेचा कारभार डिजिटल करण्यावर भर दिला आहे. विद्यार्थी केंद्रभूत मानून पालिकेच्या शाळा डिजिटल करण्याबरोबरच स्वच्छतेसाठी कचरा विलगीकरण बंधनकारक केले आहे. दिव्यांग, महिलांसाठी योजनांचा समावेश करताना विनाअडथळा सुरक्षित प्रवासाचे आश्‍वासन देऊन प्रदूषणमुक्त नाशिकसाठी सायकल व जॉगिंग ट्रॅक, "प्रोजेक्‍ट गोदा'च्या माध्यमातून प्रदूषणमुक्त नदी व उत्पन्नाचे साधन महापालिकेला उपलब्ध करून देण्याचा निश्‍चय केला आहे. 

स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर- आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आयुक्त मुंढे यांनी 2017-18 चे सुधारित व 2018-19 चे अंदाजपत्रक सादर केले. महापालिकेच्या उत्पन्नात 331 कोटी 75 लाखांची वाढ करून 1783.24 कोटींचे, 1.91 कोटी रुपयांचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. गेल्या आर्थिक वर्षात एक हजार 453 कोटी 40 लाखांचे अंदाजपत्रक सादर केले होते. मालमत्ता करवाढ व सर्वेक्षणातून आढळलेल्या अतिरिक्त मालमत्तांवर लावला जाणारा कर, कम्पाउंडिंग स्ट्रक्‍चर व महापालिकेच्या मिळकती रेडीरेकनर दराप्रमाणे देण्याचा निर्णय घेतल्याने ही जमेची बाजू गृहित धरून अंदाजपत्रकात वाढ करण्यात आली. कामाची गरज, व्यवहार्यता व निधीची उपलब्धता या त्रिसूत्रींचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. प्रभागनिहाय तीन कोटी रुपये नगरसेवक विकासनिधी देण्याची मागणी फेटाळून लावताना आयुक्तांनी चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपट्टीत करवाढ करण्याची मागणीही केली आहे. महापालिकेमार्फत यापुढे सुविधा घेताना त्याचे दामही मोजावे लागणार असल्याचे सूचित केले. नाशिकचा विचार करता गावठाण व नववसाहतींकडे लक्ष देण्यात आले असून, पाणीपुरवठा, पथदीप, रस्ते व ड्रेनेज सुविधांसाठी खास तरतूद केली आहे. 

महापालिकेच्या उत्पन्नाच्या बाजू 
महापालिकेचे एक हजार 785 कोटींचे अंदाजपत्रक सादर करताना एलबीटी अनुदानातून 967 कोटी 26 लाख रुपये उत्पन्न गृहित धरण्यात आले. घरपट्टीतून 253.69 कोटी, विकासकरातून 69.40 कोटी, सेवा सुविधांपासून 153.98 कोटी, पाणीपट्टीतून साठ कोटी रुपये उत्पन्न गृहित धरले आहेत. महसुली खर्च 638 कोटी रुपये, तर भांडवली कामांसाठी 650 कोटी रुपये खर्च गृहित धरला आहे. 26 कोटींचा खर्च देखभाल दुरुस्तीसाठी होणार आहे. महापालिकेचे सध्याचे सुमारे 550 कोटींचे दायित्व कमी करण्यावर भर दिला आहे. 

महत्त्वाकांक्षी योजना 
- शहर बससेवेसाठी तीस कोटींची तरतूद 
- विनाअडथळा चालण्यायोग्य शहर बनविणार 
- गावठाण भागात चोवीस तास पाणीपुरवठा 
- गावठाणात 101, तर नवनगरात 102 किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या 
- नवीन वसाहतीत कच्चे, जेथे खडीचे रस्ते तेथे पक्के रस्ते करणार 
- शहरात तीन हजार 750 नवीन विजेचे खांब उभारणार 
- कृषिनगरसह शहरात सायकल व जॉगिंग ट्रॅक 
- 128 कोटी रुपयांतून गोदावरी विकास 
- 28 ठिकाणी ऑफ स्ट्रीट, तर पाच ठिकाणी ऑनस्ट्रिट पार्किंग 
- पाण्याचा अचूक वापर नोंदविण्यासाठी स्काडा तंत्रज्ञानाचा वापर 
- महापालिकेचे डिजिटायजेशन 
- अपंगांसाठी डिटेक्‍शन सेंटर 
- मखमलाबाद व कामटवाडे येथे नवीन मलनिस्सारण केंद्रे 
- क्रीडांगणे व उद्यानांचा थीम बेसवर विकास 
- महावितरणप्रमाणे पाण्याची देयके 
- सिंहस्थ भूसंपादनासाठी शंभर कोटींची तरतूद 
- शहराते शेअरिंग सायकल उपक्रम 

Web Title: nashik news nashik municipal corporation