महापालिकेचे प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नाशिक - रस्ते, पथदीप, आरोग्य व पाणीपुरवठा या प्रमुख चार मूलभूत सोयी-सुविधा नागरिकांना पुरविताना महत्त्वाकांक्षी प्रकल्प निर्माण करण्याकडे काही वर्षांत झुकलेल्या महापालिकेसाठी आता तेच प्रकल्प पांढरा हत्ती ठरू लागले आहेत. त्यामुळे येत्या काळात महापालिकेचे हे प्रकल्प ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ (पीपीपी) या तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी याबाबत माहिती दिली. यात दादासाहेब फाळके स्मारक डिसेंबरअखेर विकसित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. 

महापालिकेच्या स्थापनेनंतर शहरात काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे राहिले, त्यात दादासाहेब फाळके यांच्या नावाने पांडवलेणीच्या पायथ्याशी स्मारक उभारण्यात आले. स्मारकाच्याच बाजूला बुद्ध स्मारकाची निर्मिती करण्यात आली. महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन, पं. पलुस्कर सभागृह, तारांगण, नाशिक रोड येथील आंतरराष्ट्रीय तरण तलाव, पेलिकन पार्क, यशवंत मंडई असे अनेक प्रकल्प महापालिकेने उभे केले; पण त्याकाळी परवडणारे प्रकल्प सद्यःस्थितीत चालविणे अवघड आहे. तारांगणसारख्या प्रकल्पाचे उत्पन्न पाच लाख, तर खर्च वार्षिक २२ लाख रुपये आहे. महापालिकेने या प्रकल्पांच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचा अनेकदा प्रयत्न केला; पण यश आले नाही. देखभाल-दुरुस्तीवरचा खर्च पाहता महापालिकेला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने आता हे प्रकल्प डोईजड झाले आहेत. ‘स्मार्टसिटी’अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण सुरू आहे. 

Web Title: nashik news nashik municipal corporation ppp