प्रतीकात्मक बाळांना घेत राष्ट्रवादीचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नाशिक - अपुऱ्या इन्क्‍युबेटरमुळे अर्भकांच्या झालेल्या मृत्यूमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कामकाजावर चहुबाजूने टीका सुरू असून, आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. बाळांच्या प्रतीक स्वरूपात बाहुल्या हातात घेऊन नेत्या आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जिल्हा रुग्णालयाचे कामकाज सुधारा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महिला पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून निदर्शने केली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार, युवती जिल्हाध्यक्ष प्रतीक्षा बिल्लाडे, सुषमा पगारे, समीना मेमन, शोभा साबळे, अनिता भामरे, माधुरी गायधनी, योगिता आवारे, अपर्णा देशमुख, मेघा दराडे, सायरा शेख, अर्चना परछा, पूनम बर्वे, मंजुशा महेश, पूनम शहा, पुष्पा सहारे, कमल सोनवणे, सरला गायकवाड, मनीषा गाडेकर, मंदा आव्हाड, वनिता सिंग, अर्चना आव्हाड, आफरिन सय्यद, संगीता कंगना, उज्ज्वला गायकवाड, नैना भालेराव, रूप गीत, कोमल निकाळे, अंकिता पवार, गायत्री झांजरे, काजल बोदडे, पूजा कर्डक, राधा कुटे, कोमल शिंदे, वैशाली आहिरे, प्रियंका मानधने आदींनी जोरदार निदर्शने केली.

कोंबाकोंबी थांबवाच
प्रेरणा बलकवडे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील कारभारावर टीका केली. हलगर्जीमुळे पाच महिन्यांत १८७ नवजात बालकांचा मृत्यू झाला. कुपोषित, नवजात व मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांसाठी फक्त १८ इन्क्‍युबेटर असून, त्यात ४२ बालके ठेवलेली आहेत. ही कोंबाकोंबी थांबवा, अशी मागणी केली. कोंबाकोंबीमुळे बालके दगावण्याचा धोका वाढला असूनही अद्याप जिल्ह्याचे पालकमंत्री फिरकले नाहीत. जिल्ह्यात वैद्यकीयसेवा कोलमडली आहे. स्वाइन फ्लू, डेंगी व अन्य साथींचे थैमान सुरू आहे. त्याला आवर घालण्याची मागणी केली.

Web Title: nashik news NCP agitation for child