गावठी कट्‌टा-काडतुसांसह एकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

नाशिक - गोदाकिनाऱ्यावरील आसाराम बापू पूल येथे 30 हजार रुपयांचा गावठी कट्टा व काडतुसे घेऊन आलेल्या संशयिताला नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. दरम्यान, गेल्या आठवडाभरामध्ये गावठी कट्ट्यासह तिघांना गुन्हे शाखेच्याच पथकाने अटक केली आहे. मध्य प्रदेशातून शिरपूर-चोपडामार्गे नाशिकमध्ये गावठी कट्टे दाखल होत असताना, मोकाटपणे कट्टे बाळगून फिरणाऱ्यांमुळे शहराची सुरक्षितताच धोक्‍यात आली आहे. 

गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस नाईक दिलीप मोंढे यांना खबऱ्यामार्फत, गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयितांची माहिती मिळाली होती. त्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी माहिती दिली. त्यानुसार, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर रोड परिसरातील गोदावरी नदीकिनारी असलेल्या आसाराम बापू पूल याठिकाणी सापळा रचला. काल सायंकाळी एक संशयित त्याठिकाणी संशयास्पदरीत्या हालचाली करताना पोलिसांना दिसला आणि संशयितास दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अटक केली. 

Web Title: nashik news One person arrested with cartridges