कांद्याचे आजपासून लिलाव पूर्ववत सुरू होणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

नाशिक - कांद्याच्या दरावर नियंत्रणासाठी साठेबाजीच्या आशंकेने व्यापाऱ्यांवर छापे टाकणे हा पर्याय नाही. छाप्यातून व्यापाऱ्यांपेक्षा शेतकरीच जास्त नाडला जातो. त्यामुळे कांद्याचे उत्पादन आणि बाजारातील स्थितीचा अंदाज घेऊन कांद्याच्या भावाचे एक सूत्र निश्‍चित केले जावे, ज्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांचे नुकसान टळेल, नाशिकची बदनामी थांबेल, अशी मागणी करीत आज जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बंद मागे घेत, उद्या (ता.18) पासून पूर्ववत लिलाव सुरू करण्याचे जाहीर केले. 

नाशिकला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज कांदा व्यापारी आणि बाजार समितीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. बैठकीत, कांदा प्रश्‍नावर जोरदार चर्चा झाली. प्राप्तिकर विभागाच्या छाप्यापासून तर काही प्रसारमाध्यमांवर वादळी चर्चा झाली. बैठकीच्या सुरवातीलाच, फक्त कांदा व्यापारीच चोर आहे का, असा सरळ प्रश्‍न करीत कांदा व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या.

Web Title: nashik news onion